स्तोत्रसंहिता ११९:१५३-१६०
१५३
माझ्या दुःखाकडे पाहा आणि मला त्यातून सोडवा, कारण मी तुमच्या आज्ञा विसरलो नाही.
१५४
माझ्या वादाचे समर्थन करा आणि माझी सुटका करा; आपल्या अभिवचनाप्रमाणे माझ्या जीवनाचे जतन करा.
१५५
दुष्ट लोक तारणप्राप्तीपासून फार दूर आहेत, कारण ते तुमच्या नियमांचा मुळीच शोध करीत नाहीत.
१५६
हे याहवेह, तुमची दया किती महान आहे; तुमच्या नियमानुसार माझे जतन करा.
१५७
मला छळणारे कितीतरी शत्रू आहेत, पण मी तुमचा आज्ञाभंग केला नाही.
१५८
मला या विश्वासघातक्यांचा वीट आला आहे, कारण ते तुमच्या वचनाचे पालन करीत नाहीत.
१५९
याहवेह पाहा, मी तुमच्या आज्ञांवर किती मनापासून प्रीती करतो; तुमच्या वात्सल्यानुरूप माझी जोपासना करा.
१६०
तुमची सर्व वचने पूर्णपणे सत्य आहेत; तुमचे सर्व नीतियुक्त न्याय अनंतकाळचे आहेत.
Settings