मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे २५:२३-२८

वर्तन व परिणाम

नीतिसूत्रे २५:२३-२८
२३
जसा उत्तरेकडील वारा अनपेक्षितपणे पाऊस आणतो तसेच कावेबाज जीभ—क्रोधित मुद्रेला चेतावणी देते.
२४
भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्‍यात राहणे बरे.
२५
दूरवरून आलेला शुभ संदेश तान्हेल्याला मिळालेल्या शीतल जलासारखा आहे.
२६
नीतिमान मनुष्याने दुष्टासमोर माघार घेणे, हे पाण्याचा झरा दूषित होणे किंवा जलकुंड गढूळ होण्यासारखे आहे.
२७
जसे अति मध खाणे हानिकारक आहे आणि अति खोल गोष्टींचा शोध घेणे सन्माननीय नसते.
२८
स्वतःवर ताबा नसलेला मनुष्य तटबंदी ढासळलेल्या नगरासारखा आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options