Skip to content
नीतिसूत्रे २४:२३-२९

ज्ञानींची आणखी वचने

नीतिसूत्रे २४:२३-२९
२३
ही सुद्धा सुज्ञ माणसांची वचने आहेत: न्यायदान करताना पक्षपात दाखविणे हे चांगले नाहीच:
२४
जो कोणी दुष्टाला “तू निर्दोष आहेस,” असे म्हणतो त्याला लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्याचा धिक्कार करतील.
२५
परंतु जे लोक दोषी मनुष्याला दोषी ठरवतील, आणि त्यांच्यावर विपुल आशीर्वाद येईल.
२६
प्रामाणिकपणाने दिलेले उत्तर मिळणे म्हणजे ओठांवरील चुंबनासारखे आहे.
२७
तुझे बाहेरचे काम योग्यप्रकारे पूर्ण कर आणि तुझे शेत तयार कर; त्यानंतर, तुझे घर बांध.
२८
विनाकारण तुझ्या शेजार्‍याविरुद्ध साक्ष देऊ नकोस— गैरसमज करून देण्यासाठी तू तुझ्या जिभेचा उपयोग करावा काय?
२९
असे म्हणू नकोस, “ते जसे माझ्याशी वागले आहेत तसेच मी त्यांच्याशी वागेन; त्यांनी जसे माझे केले तशीच मी त्यांची परतफेड करेन.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options