Skip to content
नीतिसूत्रे २४:३०-३४

आळशी मनुष्याच्या शेताचे निरीक्षण

नीतिसूत्रे २४:३०-३४
३०
एका आळशी मनुष्याच्या शेताच्या बाजूने मी गेलो, ज्याच्याकडे विवेकबुद्धी नाही अशा माणसाच्या द्राक्षमळ्याच्या बाजूने मी गेलो;
३१
सर्वत्र काटेरी झुडपे उगविलेली होती, आणि संपूर्ण भूमी तणाने झाकली गेलेली होती; त्याचे दगडी कुंपणही ढासळले होते.
३२
जे काही मी पाहिले त्याचा मी विचार करू लागलो आणि जे काही मी पाहिले त्यापासून एक धडा शिकलो:
३३
आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती—
३४
आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल आणि सशस्त्र मनुष्याप्रमाणे गरिबी येईल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options