नीतिसूत्रे २४:१७
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १७ दाखवत आहे.
१४
त्याचप्रमाणे सुज्ञता तुझ्यासाठी मधासारखी आहे हे लक्षात घे: जर तुला ती मिळाली तर त्यातच तुझ्या भविष्याची आशा आहे, आणि तुझी आशा कधीही तुटणार नाही.
१५
चोरासारखा नीतिमान माणसाच्या घराजवळ लपून बसू नकोस, त्यांच्या राहत्या घराची लूट करू नको;
१६
कारण नीतिमान जरी सात वेळा पडतात, तरी ते पुन्हा सावरतात, परंतु जेव्हा दुष्ट लोकांवर अरिष्ट कोसळते, ते नाश पावतात.
१७
जेव्हा तुझा शत्रू पडतो तेव्हा आनंद करू नकोस; जेव्हा ते अडखळतात तेव्हा तुझे मन आनंदित होऊ नये,
१८
नाहीतर याहवेह ते पाहतील आणि अमान्य करतील आणि त्यांच्या क्रोधापासून त्यांना दूर करतील.
१९
वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांवर संतापू नका. किंवा दुष्ट लोकांचा हेवा करू नका,
२०
कारण दुष्ट माणसांना भावी आशा नसते; आणि दुष्ट लोकांची ज्योत मालवली जाईल.
Settings