नीतिसूत्रे २२:२२-२९
२२
गरिबांना ते गरीब आहेत म्हणून लुबाडू नका, आणि गरजवंतांना न्यायालयात चिरडू नका,
२३
कारण याहवेह त्यांचा खटला लढतील आणि जीवनासाठी जीवन घेतील.
२४
तापट माणसांची मैत्री करू नका, जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका,
२५
नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल, आणि तुम्ही स्वतःच आपला जीव पाशात घालाल.
२६
वचन देऊन हात मिळवणी करणार्यासारखे तुम्ही होऊ नका किंवा कर्जाचे जामीन होऊ नका;
२७
जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील.
२८
ज्या तुमच्या पूर्वजांनी निश्चित केल्या आहेत त्या पुरातन सीमारेषांच्या खुणा बदलू नका.
२९
आपल्या कामात निपुण असणारी माणसे तू पाहिली आहे का? ते खालच्या श्रेणीच्या अधिकार्यांसमोर नाही तर राजांसमोर सेवा करतील.
Settings