मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे २०:२०-२५

कौटुंबिक कर्तव्य व दैवी सार्वभौमत्व

नीतिसूत्रे २०:२०-२५
२०
जो आपल्या आईवडिलांना शिव्याशाप देतो, त्याचा दीप गडद अंधारात विझून जाईल.
२१
वारसासंपत्तीसाठी उतावळेपणे समयापूर्व केलेला दावा शेवटपर्यंत आशीर्वादित राहत नाही.
२२
“वाईटाची फेड मी नक्की करेन!” असे म्हणू नकोस. याहवेहची प्रतीक्षा कर, ते तुझ्यासाठी प्रतिशोध घेतील.
२३
वजनात व मापात फरक असणे याचा याहवेहला वीट आहे आणि अप्रामाणिक वजनकाटे त्यांना प्रसन्न करीत नाहीत.
२४
याहवेह मनुष्याचे मार्ग निर्धारित करतात. तर मग स्वतःचे मार्ग कोण समजू शकेल?
२५
विचार न करता घाईघाईने समर्पण करणे आणि नंतर दिलेल्या शपथांचा विचार करणे, मनुष्यासाठी हा एक सापळा आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options