Skip to content
नीतिसूत्रे २०:१३-१९

व्यवहारातील परिश्रम व प्रामाणिकपणा

नीतिसूत्रे २०:१३-१९
१३
तू झोपेची आवड धरू नकोस, नाहीतर तू गरीब होत जाशील; जागा राहा आणि तुझ्याकडे विपुल खाद्य शिल्लक राहील.
१४
खरेदी करणारा म्हणतो, “हे चांगले नाही, हे चांगले नाही!” नंतर तो जातो आणि खरेदी बद्दल बढाई मारतो.
१५
सोने आहे आणि माणकेही भरपूर आहेत, परंतु शहाणपणाचे शब्द बोलणारे ओठ दुर्मिळ रत्न आहे.
१६
जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे; जर ते परक्यासाठी केले असेल तर ते गहाण म्हणून घे.
१७
फसवणूक करून मिळविलेले अन्न स्वादिष्ट लागते, परंतु त्याचे मुख शेवटी खड्यांनी भरून जाईल.
१८
सल्ला घेऊन योजना स्थापल्या जातात; म्हणून युद्ध करण्यापूर्वी योग्य मार्गदर्शन मिळव.
१९
चहाड्या करणारा विश्वासघात करतो; म्हणून अतिशय बोलणार्‍यापासून दूर राहावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options