मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे १५:२५-२९

देवाचा न्याय व संरक्षण

नीतिसूत्रे १५:२५-२९
२५
गर्विष्ठांच्या घराचा याहवेह नाश करतात, परंतु ते विधवांची दगडी सीमा सुरक्षित ठेवतात.
२६
दुष्टाच्या विचारांचा याहवेह द्वेष करतात, परंतु प्रेमळ शब्द त्यांच्या दृष्टीने निर्मळ असतात.
२७
लोभी माणसे त्यांच्या परिवारांवर विनाश आणतात, परंतु जो लाच घेणे घृणित मानतो, तो जगेल.
२८
नीतिमानाचे अंतःकरण विचारांती उत्तर देते, परंतु दुष्टाच्या मुखातून दुर्वचनाचा प्रवाह निघतो.
२९
याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात, पण धार्मिकांच्या प्रार्थना मात्र ते ऐकतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options