Skip to content
नीतिसूत्रे १५:२०-२४

सल्ला व परिश्रमाचे महत्त्व

नीतिसूत्रे १५:२०-२४
२०
समंजस पुत्र आपल्या वडिलांना आनंद देतो, परंतु मूर्ख मनुष्य आईला तुच्छ लेखतो.
२१
मूर्खपणा विवेकहीन मनुष्यास आनंदित करतो, पण विवेकशील मनुष्य सरळ मार्ग धरून राहतो.
२२
उपयुक्त सल्लागार नसले की योजना विफल होतात; परंतु अनेक सल्लागारांमुळे योजना यशस्वी होतात.
२३
समर्पक उत्तर देण्यात प्रत्येकाला आनंद वाटतो— योग्य वेळी उपयुक्त सल्ला मिळणे किती महत्त्वाचे आहे!
२४
सुज्ञासाठी जीवनाचा मार्ग वर चढविणारा असतो तो त्याला खाली मृतलोकात जाण्यापासून रोखतो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options