नीतिसूत्रे १५:१६-१९
१६
अपार समृद्धी व त्यासोबत येणारी संकटे असणे, यापेक्षा याहवेहचे भय बाळगून मिळविलेले थोडेसे धन बरे.
१७
तिरस्काराने वाढलेल्या पुष्ट वासराच्या मेजवानीपेक्षा प्रीतीने वाढलेले थोडेसे शाकाहारी जेवण बरे.
१८
तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो, तर शांत स्वभावाचा मनुष्य तंटा मिटवितो.
१९
आळशी माणसाच्या वाटेवर काटेरी कुंपणासारखे अडथळे असतात, परंतु नीतिमानाची वाट राजमार्ग असतो.
Settings