मुख्य मजकुरावर जा
गणना ४:२९-३३

मरारीच्या वंशजांच्या जबाबदाऱ्या व जनगणना

गणना ४:२९-३३
२९
“मरारी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती करावी.
३०
म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती करावी.
३१
सभामंडपातील त्यांच्या सेवेचा भाग म्हणून, त्यांनी निवासमंडपाच्या फळ्या, त्याची अडसरे, खांब आणि बैठका वाहून न्याव्या,
३२
त्याचप्रमाणे सभोवतालच्या अंगणाचे खांब, त्यांच्या बैठका, मेखा, दोर्‍या, त्याची सर्व उपकरणे आणि त्याच्या वापरासंबंधीचे सर्व साहित्य न्यावे. ज्या पुरुषाने जी ठराविक वस्तू वाहून न्यावयाची आहे ती त्याला नेमून द्यावी.
३३
अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या मार्गदर्शनाखाली राहून सभामंडपात जी सेवा मरारी कुळांनी करावयाची आहे ती हीच आहे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options