Skip to content
गणना ४:२१-२८

गणना ४:२१-२८

२१
याहवेह मोशेला म्हणाले,
२२
गेर्षोनी लोकांची त्यांचे घराणे व कूळ यानुसार जनगणना करावी.
२३
म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करावी.
२४
“वाहून नेणे व त्यांची इतर कामे करणे, ही गेर्षोनी कुळांची सेवा आहे:
२५
त्यांनी निवासमंडपाचे पडदे, सभामंडप व त्याचे आच्छादन व त्याचे टिकाऊ चर्माचे बाहेरील आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा वाहून न्यावा.
२६
निवासमंडप आणि वेदीच्या सभोवतालच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, दोर्‍या आणि मंडपातील सेवा करण्यासाठी वापरलेली सर्व उपकरणे. या संबंधीच्या ज्यागोष्टी करण्याची गरज आहे, त्या गेर्षोनी लोकांनी कराव्‍यात.
२७
गेर्षोनी लोकांनी सर्व सेवा, वाहून नेण्यासंबंधी असो किंवा इतर कामे असो, ती अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडावी. त्यांनी जे काही वाहून न्यायचे आहे ते त्यांना त्यांची जबाबदारी म्हणून तू नेमून द्यावे.
२८
सभामंडपात गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा ती हीच आहे. त्यांची कर्तव्ये अहरोन याजकाचा मुलगा इथामार याच्या मार्गदर्शनाखाली असावीत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options