गणना ४:२४-३३
२४
“वाहून नेणे व त्यांची इतर कामे करणे, ही गेर्षोनी कुळांची सेवा आहे:
२५
त्यांनी निवासमंडपाचे पडदे, सभामंडप व त्याचे आच्छादन व त्याचे टिकाऊ चर्माचे बाहेरील आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा वाहून न्यावा.
२६
निवासमंडप आणि वेदीच्या सभोवतालच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, दोर्या आणि मंडपातील सेवा करण्यासाठी वापरलेली सर्व उपकरणे. या संबंधीच्या ज्यागोष्टी करण्याची गरज आहे, त्या गेर्षोनी लोकांनी कराव्यात.
२७
गेर्षोनी लोकांनी सर्व सेवा, वाहून नेण्यासंबंधी असो किंवा इतर कामे असो, ती अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडावी. त्यांनी जे काही वाहून न्यायचे आहे ते त्यांना त्यांची जबाबदारी म्हणून तू नेमून द्यावे.
२८
सभामंडपात गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा ती हीच आहे. त्यांची कर्तव्ये अहरोन याजकाचा मुलगा इथामार याच्या मार्गदर्शनाखाली असावीत.
२९
“मरारी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती करावी.
३०
म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती करावी.
३१
सभामंडपातील त्यांच्या सेवेचा भाग म्हणून, त्यांनी निवासमंडपाच्या फळ्या, त्याची अडसरे, खांब आणि बैठका वाहून न्याव्या,
३२
त्याचप्रमाणे सभोवतालच्या अंगणाचे खांब, त्यांच्या बैठका, मेखा, दोर्या, त्याची सर्व उपकरणे आणि त्याच्या वापरासंबंधीचे सर्व साहित्य न्यावे. ज्या पुरुषाने जी ठराविक वस्तू वाहून न्यावयाची आहे ती त्याला नेमून द्यावी.
३३
अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या मार्गदर्शनाखाली राहून सभामंडपात जी सेवा मरारी कुळांनी करावयाची आहे ती हीच आहे.”
Settings