मुख्य मजकुरावर जा
गणना २३:१८-२६

बलामचे दुसरे संदेशवचन: देवाची विश्वासार्हता

गणना २३:१८-२६
१८
नंतर त्याने हा संदेश सांगितला: “बालाका, ऊठ आणि ऐक; सिप्पोरच्या पुत्रा, माझे ऐक.
१९
परमेश्वर मनुष्य नाहीत की त्यांनी लबाडी करावी, ते मानव नाहीत, की त्यांनी आपले मन बदलावे. याहवेह बोलणार आणि त्यानुसार करणार नाहीत काय? त्यांनी अभिवचन दिले आणि ते पूर्ण करणार नाहीत काय?
२०
आशीर्वाद देण्याची आज्ञा मला मिळाली आहे; याहवेहने आशीर्वाद दिला आहे आणि मी तो बदलू शकत नाही.
२१
“याकोबात विपत्ती सापडली नाही, इस्राएलात क्लेश दिसत नाहीत. त्यांचे परमेश्वर याहवेह त्यांच्याबरोबर आहेत; राजाचा जयघोष त्यांच्यामध्ये आहे.
२२
परमेश्वराने त्यांना इजिप्तच्या बाहेर आणले. रानबैलासारखे त्यांचे बळ आहे.
२३
याकोबाविरुद्ध मंत्रतंत्र नाही, इस्राएलविरुद्ध अपशकुन नाही. याकोबाविषयी व इस्राएलाविषयी असे म्हटले जाईल, परमेश्वराने काय केले आहे ते पाहा!
२४
लोक सिंहिणीप्रमाणे उठतात; ते सिंहासारखे उभे राहतात जे त्याची शिकार खाईपर्यंत व वधलेल्यांचे रक्त पिईपर्यंत विसावा घेत नाहीत.”
२५
मग बालाक बलामाला म्हणाला, “त्यांना अजिबात शापही देऊ नकोस किंवा आशीर्वादही देऊ नकोस.”
२६
बलामाने बालाकाला उत्तर दिले, “याहवेह जे सांगतील त्याचप्रमाणे मी केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options