मुख्य मजकुरावर जा
गणना १५:१-१६

धान्य आणि पेयार्पणांचे नियम

गणना १५:१-१६
याहवेह मोशेला म्हणाले,
“इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: जो देश मी तुम्हाला तुमच्या वस्तीसाठी देत आहे त्यात तुम्ही प्रवेश कराल
आणि याहवेहसाठी सुवास म्हणून आपली खिल्लारे व गुरे यातून तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण कराल, मग ते होमार्पण किंवा यज्ञ असो, विशेष नवस असो किंवा स्वखुशीचे अर्पण किंवा सणाचे अर्पण असो.
अर्पण आणणार्‍याने याहवेहसमोर एक पाव हीन जैतुनाच्या तेलात मळलेल्या बारीक सपिठाचा एका एफाचा दहावा भाग सादर करावा.
होमार्पण किंवा यज्ञासाठी एका कोकराबरोबर, पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस तयार करावा.
“ ‘मेंढ्याबरोबर एक एफाचे दोन भाग बारीक सपीठ, एकतृतीयांश हीन जैतुनाच्या तेलात मळून अन्नार्पण तयार करावे,
आणि अन्नार्पण म्हणून एकतृतीयांश हीन द्राक्षारस, हे सर्व याहवेहला सुवास म्हणून अर्पण करावे.
“ ‘जेव्हा तुम्ही होमार्पण किंवा यज्ञ म्हणून, याहवेहला विशेष नवस किंवा शांत्यर्पण म्हणून एक तरुण बैल तयार करता,
बैलाबरोबर एफाचे तीन दशांश बारीक सपीठ, अर्धा हीन जैतुनाच्या तेलात मळलेले असे अन्नार्पण आणावे.
१०
आणि पेयार्पण म्हणून अर्धा हीन द्राक्षारस आणावा. हे याहवेहसाठी सुवासिक असे अन्नार्पण आहे.
११
प्रत्येक बैल किंवा मेंढा, प्रत्येक कोकरू किंवा तरुण बोकड अशा प्रकारे तयार करावे.
१२
जितक्यांदा तुम्ही हे तयार करता, प्रत्येकासाठी असेच करावे.
१३
“ ‘देशाच्या प्रत्येक रहिवासीने याहवेहला सुवासिक अन्नार्पण सादर करताना या गोष्टी अशाच पद्धतीने कराव्या.
१४
जेव्हा कोणी परदेशी किंवा तुमच्यामधील कोणीही इतर रहिवासी याहवेहला सुवासिक अन्नार्पण सादर करतात, त्यांनीही तुम्ही ज्याप्रकारे करतात, त्याच पद्धतीने करावे, हे पुढील सर्व पिढ्यांपर्यंत असावे.
१५
समुदायाने स्वतःसाठी व तुमच्यामध्ये असलेल्या परदेशीयांसाठी सारखेच नियम पाळावे. येणार्‍या पिढ्यांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा. तुम्ही व परदेशी याहवेहसमोर सारखेच आहात.
१६
तुमच्यासाठी व तुमच्यामध्ये असलेल्या परदेशीयांसाठी एकच नियम व कायदे असावेत.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options