मुख्य मजकुरावर जा
नहेम्याह ६:१०-१४

खोट्या भविष्यवाणीचा धोका

नहेम्याह ६:१०-१४
१०
एक दिवस मी महेटाबेलाचा पुत्र दलायाहचा पुत्र शमायाह याच्या घरी गेलो, जो त्याच्या घराबाहेर पडत नसे. तो म्हणाला, “आपण परमेश्वराच्या भवनात भेटू या, मंदिराची दारे व कड्या लावून घेऊ, कारण तुला ठार मारण्यास माणसे येत आहेत—आज रात्री ते तुला ठार करण्यासाठी येतील.”
११
पण मी म्हणालो, “माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय? अथवा माझ्यासारख्याने स्वतःचा प्राण वाचविण्याकरिता मंदिरात लपून बसावे? मी मुळीच जाणार नाही!”
१२
नंतर मला समजले की परमेश्वराने त्याला पाठविले नव्हते, परंतु तोबीयाह व सनबल्लट यांनी माझ्याविरुद्ध भविष्यवाणी करण्यासाठी त्याला लाच दिली होती.
१३
मी घाबरून माझ्याकडून असे पाप घडावे व त्यांनी मजवर दोषारोप करावा, मग मी निंदेस पात्र व्हावे, अशा उद्देशानेच त्यांनी शमायाहला या कामासाठी घेतले होते.
१४
हे माझ्या परमेश्वरा, तोबीयाह, सनबल्लट हे माझ्याशी कसे वागले हे विसरू नका. नोअद्याह संदेष्टी व इतर संदेष्टे ज्यांनी मला भीती घालण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही तुम्ही विसरू नका.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options