Skip to content
नहेम्याह २:१-१०

नहेम्याह २:१-१०

पुढे अर्तहशश्तच्या राजवटीच्या विसाव्या वर्षी, निसान महिन्यामध्ये एके दिवशी, राजाला द्राक्षारस देण्यात आला, तेव्हा मी प्याला भरला व राजाला दिला. आजपर्यंत मी राजाच्या उपस्थितीत कधीही दुःखी असा दिसलो नव्हतो.
म्हणून राजाने मला विचारले, “तू आजारी नसताना तुझा चेहरा एवढा खिन्न का दिसतो? तुझ्या मनात निराशा असल्याशिवाय असे होणार नाही.” मी घाबरलो,
पण मी राजाला उत्तर दिले, “महाराज, अनंतकाळ चिरंजीव राहोत! माझा चेहरा दुःखी का असू नये, कारण ज्या नगरामध्ये माझ्या पूर्वजांना पुरले आहे, त्या नगराचा विध्वंस झाला आहे व त्याच्या वेशी जाळून टाकल्या आहेत.”
राजाने मला विचारले, “तुझी काय इच्छा आहे?” स्वर्गातील परमेश्वराची मनात प्रार्थना करून मी उत्तर दिले,
“महाराज प्रसन्न असतील आणि त्यांचा सेवक शाही मर्जीतील असेल, तर जिथे माझ्या पूर्वजांना दफन केले आहे त्या नगराची पुनर्बांधणी करण्यासाठी महाराजांनी मला यहूदीयाला पाठवावे.”
नंतर राजाच्या शेजारी राणी बसलेली असताना, राजाने मला विचारले, “किती काळासाठी तुला जावे लागेल व तू केव्हा परत येशील?” मला पाठविण्याचे राजाच्या मर्जीस आले म्हणून मी माझ्या जाण्याची वेळ ठरविली.
पुढील गोष्टींसाठी देखील मी विनंती केली, “महाराज, आपण माझ्यावर प्रसन्न असाल, तर कृपा करून फरात नदीच्या पश्चिमेकडील राज्यपालांसाठी मजजवळ पत्रे द्यावी, म्हणजे त्यांनी मला त्यांच्या प्रांतातून यहूदीयाला सुखरुपपणे प्रवास करू द्यावा.
एक पत्र शाही जंगलाचा व्यवस्थापक आसाफ यांच्यासाठीही द्यावे. त्या पत्रामध्ये मंदिराशेजारी असलेल्या गढीच्या दरवाजांसाठी, शहराच्या कोटासाठी व माझ्या घराला लागणार्‍या तुळयांसाठी लाकूड देण्याबद्दल त्याला आज्ञा द्यावी.” माझ्यावर परमेश्वराची हस्तकृपा असल्यामुळे राजाने या विनंत्या मान्य केल्या.
मी फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांतात पोहोचलो, तेव्हा मी राजाची पत्रे तेथील राज्यपालांना दिली. राजाने माझ्या संरक्षणासाठी लष्करी अधिकारी व घोडेस्वार सैनिक माझ्याबरोबर पाठविले होते.
१०
पण होरोनी सनबल्लट व अम्मोनी अधिकारी तोबीयाह यांना हे जेव्हा समजले तेव्हा ते फारच अस्वस्थ झाले, की कोणीतरी इस्राएलला मदत करण्यासाठी आले आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options