Skip to content
मत्तय २६:१७-२५

वल्हांडण सणाची तयारी

मत्तय २६:१७-२५
१७
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, “वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी?”
१८
येशूंनी उत्तर दिले, “शहरात जा आणि या एका माणसाची भेट घ्या. त्याला सांगा की, ‘गुरुजी म्हणतात: माझी नेमलेली वेळ जवळ आली आहे. मी माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन तुझ्या घरी करेन.’ ”
१९
येशूंनी सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी केले आणि वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
२०
संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर मेजावर टेकून बसले होते.
२१
आणि ते भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल.”
२२
येशूंचे हे उद्गार ऐकताच शिष्यांची अंतःकरणे दुःखी झाली आणि ते त्यांना विचारू लागले, “प्रभूजी, खरोखर तो मी तर नाही ना?”
२३
येशूंनी उत्तर दिले, “ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला आहे तोच माझा विश्वासघात करणार आहे.
२४
कारण त्यांच्याबद्दल लिहिल्याप्रमाणे मानवपुत्र जातो खरा. परंतु जो मानवपुत्राला विश्वासघाताने धरून देतो, त्याचा धिक्कार असो. तो जन्मलाच नसता, तर ते त्याला अधिक हिताचे झाले असते.”
२५
मग जो त्यांना धरून देणारा होता, त्या यहूदाहने येशूंना विचारले, “खरोखर रब्बी, तो मी तर नाही ना?” त्यावर येशूने उत्तर दिले, “तू स्वतःच तसे म्हटले आहेस.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options