Skip to content
मत्तय १९:२३-२९

मत्तय १९:२३-२९

२३
मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “मी तुम्हाला सत्य सांगतो, श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे कठीण आहे!
२४
मी पुन्हा सांगतो की, श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”
२५
येशूंच्या या विधानाने शिष्य गोंधळात पडले व त्यांनी विचारले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?”
२६
येशूंनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, “मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत.”
२७
यावर पेत्र येशूंना म्हणाला, “आपल्याला अनुसरण्यासाठी आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे; त्याच्या मोबदल्यात आम्हाला काय मिळेल?”
२८
येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला सत्य सांगतो, सर्व गोष्टीचे नूतनीकरण होईल, तेव्हा मानवपुत्र गौरवी सिंहासनावर बसेल आणि जे तुम्ही मला अनुसरता ते तुम्ही सुद्धा बारा सिंहासनावर बसाल व इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल.
२९
ज्या कोणी मला अनुसरण्यासाठी आपले घर, भाऊ बहीण, आई, पिता, पत्नी, मुले, मालमत्ता यांचा त्याग केला आहे, त्याला शंभरपट मोबदला तर मिळेलच, पण सार्वकालिक जीवनही मिळेल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options