मुख्य मजकुरावर जा
मार्क ५:२५-३४

रक्तस्रावाने पीडित स्त्री

मार्क ५:२५-३४
२५
आणि तिथे एक स्त्री होती, जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती.
२६
याकाळात तिने अनेक वैद्यांच्या उपचारांमुळे पुष्कळ दुःख सहन केले होते व ती कंगाल झाली होती आणि एवढे करूनही बरी न होता उलट तिचा आजार अधिकच बळावला होता.
२७
जेव्हा तिने येशूंबद्दल ऐकले, तेव्हा तिने मोठ्या गर्दीतून त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला.
२८
“मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन,” असे तिला वाटत होते.
२९
तत्काळ तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण आजारातून मुक्त झालो आहोत याची तिला शरीरात जाणीव झाली.
३०
तत्क्षणी येशूंनी आपल्यामधून शक्ती बाहेर पडली असे जाणले आणि समुदायाकडे मागे वळून त्यांनी विचारले, “माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला?”
३१
“यावर त्यांचे शिष्य म्हणाले, एवढी मोठी गर्दी तुमच्याभोवती असताना तुम्ही विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’ ”
३२
तरी आपल्याला कोणी स्पर्श केला, हे पाहण्यासाठी ते आजूबाजूला शोधू लागले.
३३
तेव्हा भयभीत झालेली ती स्त्री आपल्या बाबतीत काय घडले हे लक्षात घेऊन थरथर कापत आली आणि त्यांच्या पाया पडून तिने त्यांना सर्व खरे सांगितले.
३४
येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा आणि आपल्या पीडेपासून मुक्त राहा.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options