मुख्य मजकुरावर जा
लूक १९:२८-४०

विजयी प्रवेश

लूक १९:२८-४०
२८
हा दाखला सांगितल्यानंतर येशू यरुशलेमच्या दिशेने निघाले. ते आपल्या शिष्यांपुढे चालत होते.
२९
जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावाजवळ ते आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले की:
३०
“समोरच्या गावात जा आणि तिथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल. ते सोडून इकडे आणा.
३१
‘तुम्ही हे शिंगरू का सोडीत आहात?’ असे कोणी तुम्हाला विचारले, तर त्याला सांगा, ‘प्रभूला त्याची गरज आहे.’ ”
३२
ज्यांना पुढे पाठविले होते, ते तिथे गेल्यावर त्यांना सांगितल्याप्रमाणेच आढळून आले.
३३
ते शिंगरू सोडीत असताना शिंगराच्या धन्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही शिंगरू का सोडीत आहात?”
३४
त्यांनी उत्तर दिले, “प्रभूला याची गरज आहे.”
३५
त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले, त्यांनी त्यांची वस्त्रे, शिंगराच्या पाठीवर घातली आणि येशूंना त्याच्यावर बसविले.
३६
जेव्हा ते त्यांच्याबरोबर निघाले, लोकांनी आपले अंगरखे रस्त्यावर पसरले.
३७
जैतून डोंगराच्या उतरणीवरून सुरू होणार्‍या रस्त्यावर त्यांच्या शिष्यांचा समुदाय होता, ज्यांनी येशूंचे जे अद्भुत चमत्कार पाहिले होते, त्याबद्दल ते परमेश्वराची स्तुती करीत घोषणा देऊ लागले:
३८
“प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!” “स्वर्गात शांती आणि परमोच्चस्थानी गौरव!”
३९
गर्दीत असलेले काही परूशी येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्या शिष्यांचा निषेध करा.”
४०
पण येशूंनी त्यांना उत्तर दिले, “त्यांनी तोंडे बंद केली, तर धोंडे ओरडतील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options