लेवीय २५:३५-४१
३५
“ ‘जर तुमच्या कोणी इस्राएल बंधूला दारिद्र्य आले आणि ते तुमच्यामध्ये स्वतःचे पालनपोषण करू शकत नसतील, तर जसे तुम्ही परदेशी आणि परक्यांना मदत कराल तशी त्यांना करा, जेणेकरून ते तुमच्यामध्ये राहतील.
३६
परमेश्वराची भीती बाळगावी आणि तुमच्या बंधूला तुमच्या घरात राहू द्यावे. त्याला उसने म्हणून दिलेल्या पैशावर तुम्ही व्याज घेऊ नये.
३७
तुम्ही त्यांना व्याजाने पैसे देऊ नयेत किंवा जे खाद्यपदार्थ तुम्ही त्यांना विकाल त्यावर नफा घेऊ नये.
३८
ज्याने तुम्हाला कनान देश देण्यासाठी आणि तुमचा परमेश्वर होण्यासाठी इजिप्त देशातून बाहेर आणले, तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
३९
“ ‘जर तुमच्यापैकी कोणी इस्राएली गरीब झाला असेल आणि त्याने स्वतःला तुम्हाला विकले असेल, तर तुम्ही त्यांना गुलामासारखे कामे करावयास लावू नये.
४०
तर रोजदारीवर ठेवलेल्या नोकराप्रमाणे किंवा तुमच्या आश्रिताप्रमाणे तुम्ही त्याला वागणूक द्यावी आणि योबेल वर्षापर्यंत तो तुमची सेवा करेल.
४१
त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना सोडण्यात येईल आणि ते आपल्या कुटुंबातील पूर्वजांच्या वतनात परत जाऊ शकतील.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.