Skip to content
लेवीय २५:२३-३४

लेवीय २५:२३-३४

२३
“ ‘तुम्ही जमीन कायमचीच विकू नये. कारण जमीन माझी आहे आणि तुम्ही माझ्या भूमीवर परदेशी आणि परके म्हणून राहत आहात.
२४
तुमच्या ताब्यात असलेली संपूर्ण जमीन, तुम्ही त्या जमिनीला सोडविण्याची तरतूद केली पाहिजे.
२५
“ ‘तुमचा इस्राएली सहकारी गरीब झाला आणि त्याने त्यांची काही मालमत्ता विकली, तर त्यांच्या जवळच्या नातलगाने ती खंडणी भरून सोडवून घ्यावी.
२६
जर सोडवून घेणारा त्याला कोणी नातलग नसला आणि त्याला स्वतःलाच ती खंडणी भरून सोडवून घेण्याची ऐपत वाढली,
२७
तर योबेल वर्षापर्यंत जमीन आणखी किती वर्षे पीक देऊ शकेल हे पाहून त्या प्रमाणात तिची किंमत भरावी. जमिनीच्या सध्याच्या मालकाने तितके पैसे घेऊन तिच्या मूळ मालकाला ती परत करावी.
२८
पण मूळ मालक ती सोडवून घ्यावयाला समर्थ नसेल तर योबेल वर्षापर्यंत ती हल्लीच्या मालकाकडेच रहावी. पण योबेल वर्षी ती मूळ मालकाला परत केलीच पाहिजे.
२९
“ ‘एखाद्याने तटबंदीच्या शहरातील आपले घर विकले असेल, तर त्याला एक वर्षाच्या काळात खंडणी भरून ते परत सोडवून घेता येईल. ते सोडविण्याचा हक्क त्याला पूर्ण एक वर्ष राहील.
३०
नगर तटबंदीच्या आत असलेले घर जर त्याने ते एक वर्षाच्या आत खंडणी भरून सोडवून घेतले नाही, तर ते नव्या मालकाच्या कायमचेच मालकीचे होईल. योबेल वर्षीही ते त्याच्या मूळ मालकाला परत करावे लागणार नाही.
३१
पण गावातील घर म्हणजे ज्या वस्तीला तटबंदी नाही अशा मोकळ्या वस्तीत असलेले घर मात्र केव्हाही खंडणी भरून सोडविता येईल आणि योबेल वर्षी ते घर मालकाला परत केलेच पाहिजे.
३२
“ ‘लेवी वंशातील मनुष्याचे घर तटबंदी असलेल्या शहरात असले तरी ते त्याला केव्हाही खंडणी भरून सोडवून घेता येईल.
३३
म्हणून लेव्यांच्या मालकीचे जे काही आहे ते सोडविता येईल, आणि शहरातील त्यांच्या मालमत्तेतून विकले गेलेले घर योबेल वर्षात सोडविले जाईल, कारण लेवींच्या नगरातील घरेही इस्राएलच्या घराण्यात त्यांची मालमत्ता आहे.
३४
लेव्यांना त्यांच्या शहराभोवती असलेली कुरणे विकण्यास परवानगी नाही, कारण ती त्यांची कायमचीच मालमत्ता आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options