मुख्य मजकुरावर जा
विलापगीत ४:११-१६

देवाचा न्याय पूर्ण झाला

विलापगीत ४:११-१६
११
याहवेहने त्यांच्या क्रोधास निर्बंध सोडले आहे; त्यांचा अत्यंत भयानक क्रोध ओतला गेला आहे. त्यांनी सीयोनमध्ये अग्नी पेटविला त्या अग्नीने तिच्या पायांना भस्म करून टाकले आहे.
१२
यरुशलेमच्या वेशीतून आत एखादा शत्रू वा विरोधी शिरू शकेल, यावर संपूर्ण पृथ्वीवरील राजांनी तसेच जगातील कोणत्याही लोकांनी विश्वास ठेवला नाही.
१३
तेथील संदेष्ट्यांनी केलेली पापे आणि निर्दोष व्यक्तींचे रक्त या नगरीत सांडून याजकांनी केलेला अधर्मामुळे तसे घडले.
१४
आता तेच लोक आंधळ्यासारखे झोकांड्या खात चालले आहेत. ते रक्ताने माखून असे भ्रष्ट झाले आहेत की त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करण्याचे कोणीही धाडस करीत नाही.
१५
लोक त्यांच्यावर खेकसतात: “चालते व्हा! तुम्ही अशुद्ध आहात! दूर! दूर! आम्हाला स्पर्श करू नका!” जेव्हा ते पलायन करतात आणि तिथे भटकतात, त्या देशातील लोक म्हणतात, “ते आता इथे राहू शकत नाहीत.”
१६
स्वतः याहवेहने त्यांची पांगापांग केली आहे; ते आता त्यांचा सांभाळ करणार नाहीत. याजक सन्मानयोग्य राहिले नाहीत, वडीलजन कृपेयोग्य राहिले नाहीत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options