विलापगीत ३:४३-५३
४३
“तुम्ही आपल्या संतापाने स्वतःला वेष्टिले आणि आमचा पाठलाग केला; तुम्ही निर्दयपणे संहार केला.
४४
तुम्ही स्वतःस मेघाने आच्छादून घेतले आहे जेणेकरून कोणतीही प्रार्थना तुमच्यापर्यंत पोचू नये.
४५
तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये केरकचरा गाळ व उकिरडा केले आहे.
४६
“सर्व शत्रूंनी आपले मुख आमच्याविरुद्ध खूप रुंद उघडले आहे.
४७
आम्ही दहशत व जोखिम, विनाश आणि विध्वंस यातून गेलो आहोत.”
४८
माझ्या लोकांच्या विनाशामुळे माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह निघत आहेत.
४९
माझे डोळे अखंडपणे, न थांबता, अश्रुपात करीत राहतील,
५०
याहवेह स्वर्गातून खाली दृष्टी करून पाहीपर्यंत ते वाहत राहतील.
५१
माझ्या नगरातील स्त्रियांना बघून माझे अंतःकरण पीडित होत आहे.
५२
जे विनाकारण माझे शत्रू बनले होते, त्यांनी एखाद्या पक्ष्याप्रमाणे माझी शिकार केली आहे.
५३
त्यांनी एका खड्ड्यात माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर दगडमार केला;
Settings