शास्ते ९:७-२१
७
जेव्हा योथामाला हे सांगण्यात आले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर उभा राहिला व त्यांना उंच वाणीने ओरडून म्हणाला, “शेखेमातील नागरिकांनो माझे ऐका, म्हणजे परमेश्वर तुमचे ऐकतील.
८
एकदा वृक्षांनी त्यांच्यासाठी राजाला अभिषिक्त करण्यास गेले. ते जैतून वृक्षाला म्हणाले, ‘तू आमचा राजा हो!’
९
“परंतु जैतून वृक्षाने उत्तर दिले, ‘ज्याद्वारे दैवत आणि मनुष्य या दोघांचा सन्मान होतो ते माझे तेल देणे मी सोडून इतर वृक्षांवर हलतडुलत राहावे काय?’
१०
“नंतर ते वृक्ष अंजिराच्या वृक्षास म्हणाले, ‘ये आणि तू आमचा राजा हो!’
११
“परंतु अंजिराच्या वृक्षाने उत्तर दिले, ‘केवळ इतर वृक्षांवर हलतडुलत राहण्यासाठी मी माझे माधुर्य आणि चांगली फळे देण्याचे सोडून द्यावे का?’
१२
“मग ते वृक्ष द्राक्षवेलास म्हणाले, ‘ये आणि आमचा राजा हो.’
१३
“परंतु द्राक्षवेलाने उत्तर दिले, ‘केवळ इतर वृक्षांवर हलतडुलत राहण्यासाठी दैवत व मनुष्यांना आनंदित करणारा द्राक्षारस देण्याचे मी सोडून द्यावे का?’
१४
“अखेरीस सर्व वृक्ष काटेरी झुडूपाला म्हणाले, ‘ये आणि तू आमचा राजा हो.’
१५
“ते काटेरी झुडूप त्या वृक्षांना म्हणाला, ‘तुमचा राजा म्हणून माझा अभिषेक व्हावा अशी तुमची इच्छा आहे, हे जर सत्य असेल तर या आणि माझ्या सावलीचा आश्रय घ्या; पण जर तसे नसेल तर काटेरी झुडूपातून अग्नी निघो व तो लबानोनाचे गंधसरू भस्म करून टाको!’
१६
“तुम्ही अबीमेलेखाचा तुमचा राजा करून सन्मानाने आणि चांगल्या विश्वासाने वागलात काय? यरूब्बआल आणि त्याचा कुटुंबासाठी योग्य ते केले आहे का? ज्या योग्यतेचा तो आहे, त्याप्रमाणे त्याच्याशी वागलात का?
१७
आठवण ठेवा की माझा पिता तुमच्यासाठी लढला व तुम्हाला मिद्यानी लोकांच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला.
१८
परंतु आज तुम्ही माझ्या पित्याच्या कुटुंबाविरुद्ध बंड केले व तुम्ही त्याच्या सत्तर पुत्रांचा एका दगडावर वध केला आणि आता अबीमेलेख जो एक दासीचा पुत्र आहे, त्याला शेखेमातील नागरिकांवर राजा केले आहे, कारण तो तुमचा नातेवाईक आहे.
१९
आज तुम्ही यरूब्बआल आणि त्याच्या कुटुंबासोबत सन्मानाने आणि सदिच्छेने वागलात काय? तर मग अबीमेलेख तुमचा आनंद होवो आणि तुम्ही त्याचा आनंद होवो!
२०
परंतु जर तसे नाही, तर अबीमेलेखातून अग्नी निघून तुम्हाला, शेखेमाच्या आणि बेथमिल्लोच्या नागरिकांना भस्म करो आणि शेखेमाच्या आणि बेथमिल्लोच्या नागरिकातून अग्नी निघून अबीमेलेखाला भस्म करो!”
२१
मग योथाम निसटून गेला व आपला भाऊ अबीमेलेखाच्या भीतीमुळे बैर येथे जाऊन राहिला.
Settings