शास्ते ५:१-११
१
त्या दिवशी दबोरा आणि अबीनोअमाचा पुत्र बाराकाने हे गीत गाईले:
२
“जेव्हा इस्राएलचे राजकुमार पुढे चालतात, जेव्हा लोक स्वेच्छेने स्वतःला सादर करतात— याहवेहची स्तुती करा!
३
“अहो राजांनो हे ऐका! अधिपतींनो कान द्या! मी स्वतः याहवेहची स्तुती करेन; मी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराची स्तुती गाईन.
४
“जेव्हा याहवेह तुम्ही सेईरातून बाहेर निघाले, जेव्हा तुम्ही एदोमाच्या भूमीतून चालत गेले, पृथ्वी थरारली, आकाशाने जल ओतले, ढगांनी जलबिंदू खाली ओतले.
५
याहवेहसमोर पर्वत थरथरला, याहवेह इस्राएलच्या परमेश्वरासमोर सीनाय थरकापला.
६
“अनथाचा पुत्र शमगारच्या दिवसामध्ये, याएलच्या काळी राजमार्ग सुने पडले; प्रवाशांनी वळणाचा मार्ग वापरला.
७
इस्राएलमधील ग्रामीण लढणार नाहीत; मी, दबोरा उठेपर्यंत ते थांबले, मी, इस्राएलमधील एक माता उठेपर्यंत ते थांबले.
८
परमेश्वराने नवीन पुढारी निवडले जेव्हा युद्ध शहराच्या वेशीजवळ आले होते, परंतु इस्राएलाच्या चाळीस हजारांमध्ये एकही ढाल किंवा भाला दिसला नाही.
९
माझे हृदय इस्राएलच्या राजपुत्रांसह आहे, लोकांमध्ये स्वेच्छेने काम करणाऱ्यांबरोबर आहे. याहवेहची स्तुती हो!
१०
“तुम्ही जे शुभ्र गाढवांवर स्वार होता, गालिचांच्या खोगिरावर बसता, आणि तुम्ही त्या मार्गाने पायी चालणारे, विचार करा,
११
गायकांचा आवाज पाणवठ्याच्या ठिकाणी. ते याहवेहचे विजयगीत गातात, इस्राएलच्या गावकर्यांच्या विजयाचे स्मरण करतात. “नंतर याहवेहचे लोक शहराच्या द्वाराजवळ गेले.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings