Skip to content
शास्ते १८:१४-२६

शास्ते १८:१४-२६

१४
नंतर पाच व्यक्ती जे लईश हेरायला आले होते ते आपल्या दान भाऊबंदांना म्हणाले, “तुम्हाला माहीत आहे का या घरातील एका घरात एक एफोद, काही कुलदेवता आणि अनेक रुप्याचा मुलामा दिलेल्या मूर्ती आहेत? आता काय करावयाचे हे तुम्हाला माहीत आहे.”
१५
म्हणून ते तिथे वळले आणि मीखाहकडील त्या तरुण लेवीच्या घरी जाऊन त्याला अभिवादन केले.
१६
युद्धासाठी सज्ज असलेले दानी गोत्राचे सहाशे सैनिक प्रवेशद्वाराजवळ उभे होते.
१७
मग ते पाच पुरुष, जे तो देश हेरायला गेले होते, ते आत गेले आणि त्यांनी तेथील मूर्ती, एफोद, आणि कुलदेवता घेतली, जेव्हा पुरोहित आणि सहाशे सैनिक बाहेर प्रवेशद्वाराजवळ उभे होते.
१८
जेव्हा ते पाच पुरुष मीखाहच्या घरी गेले आणि त्यांनी मूर्ती, एफोद, आणि कुलदेवता उचलत असता, पुरोहित त्यांना म्हणाला, “तुम्ही हे काय करत आहे?”
१९
त्यांनी त्याला उत्तर दिले, “शांत राहा! एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आमच्याबरोबर ये आणि आमचा पिता आणि पुरोहित हो. केवळ एका मनुष्याचा पुरोहित होऊन राहण्यापेक्षा, इस्राएलातील एक संपूर्ण गोत्र आणि वंशाचा पुरोहित होऊन राहणे अधिक चांगले नाही का?”
२०
तेव्हा त्या पुरोहिताला अतिशय आनंद झाला. त्याने एफोद, कुलदेवता आणि मूर्ती घेतली आणि तो त्या लोकांबरोबर गेला.
२१
मग ते फिरले आणि कूच करीत असताना ते आपली लहान मुले, गुरे आणि सामान अग्रभागी घेऊन चालले.
२२
जेव्हा ते मीखाहच्या घरापासून काही दूर गेले असता, मीखाहचे शेजारी एकत्र आले आणि त्यांनी दानच्या लोकांना गाठले.
२३
जेव्हा त्यांनी दानच्या लोकांना हाक मारली तेव्हा ते वळले आणि मीखाहला विचारले, “तुला काय झाले आहे की तू आपल्या लोकांना युद्ध करण्यास घेऊन आला आहेस?”
२४
मीखाहने प्रत्युत्तर दिले, “जे दैवत मी तयार केले त्यांना आणि माझ्या पुरोहिताला तुम्ही घेऊन जात आहात आणि उलट तुम्हीच मला विचारता? मला काय हवे आहे. ‘आता माझ्याजवळ काहीही राहिलेले नाही?’ ”
२५
त्यावर दानच्या लोकांनी उत्तर दिले, “आमच्यासोबत वाद घालू नकोस, नाहीतर काही माणसांना राग येईल आणि ते तुझ्यावर हल्ला करतील आणि तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना आपला जीव गमवावा लागेल.”
२६
मग दानचे लोक आपल्या मार्गाने गेले आणि मीखाहने पाहिले ते लोक फार शक्तिशाली आहेत, तेव्हा तो माघारी फिरला आणि आपल्या घरी गेला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options