Skip to content
शास्ते १४:५-९

शास्ते १४:५-९

शमशोन त्यांच्या आईवडिलांसोबत खाली तिम्नाह येथे गेला. ते तिम्नाह येथील द्राक्षांच्या मळ्यांजवळ पोहोचले असता, अचानक एक तरुण सिंह गर्जना करीत त्याच्या अंगावर आला.
याहवेहचा आत्मा मोठ्या सामर्थ्याने त्याच्यावर आला जेणेकरून त्याने आपल्या हाताने एखादी शेळी फाडावे त्याप्रमाणे त्याने त्या सिंहाचे जबडे फाडले. परंतु त्याबद्दल आपल्या वडिलांना किंवा आईला काहीही सांगितले नाही.
नंतर शमशोन खाली गेला आणि त्या स्त्रीसह बोलला आणि ती त्याला प्रिय वाटली.
कालांतराने, जेव्हा तो तिच्यासोबत विवाह करण्यासाठी परत आला, आडवाट करून तो सिंहाचे कलेवर पाहण्यास गेला आणि त्यामध्ये त्याने मधमाश्यांचा थवा आणि काही मध पाहिला.
त्याने आपल्या हाताने तो मध घेतला आणि वाटेने मध खात खात तो पुढे गेला. जेव्हा तो आपल्या आईवडिलांजवळ पोहोचला तेव्हा त्यांनाही काही मध दिला आणि त्यांनीही तो खाल्ला. परंतु तो सिंहाच्या कलेवरातून आणला आहे, हे त्याने त्यांना सांगितले नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options