Skip to content
शास्ते १४:१०-१४

लग्नाची मेजवानी आणि कोडे

शास्ते १४:१०-१४
१०
आता त्याचे वडील त्या स्त्रीला बघायला खाली गेले. आणि तिथे शमशोनाने तरुणांच्या प्रथेप्रमाणे मेजवानी दिली.
११
जेव्हा लोकांनी त्याला पाहिले, तेव्हा त्यांनी तीस लोकांना त्याचे साथीदार म्हणून निवडले.
१२
शमशोन त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला एक कोडे सांगतो, तुम्ही मला सणाच्या सात दिवसांत उत्तर देऊ शकलात तर मी तुम्हाला तीस तागाची वस्त्रे आणि तीस जोडी कपडे देईन.
१३
जर तुम्ही मला उत्तर सांगू शकत नसाल, तर तुम्ही मला तीस तागाची वस्त्रे आणि तीस जोडी कपडे द्याल.” “तुझे कोडे आम्हाला सांग,” ते म्हणाले. “चला ऐकू या.”
१४
त्याचे कोडे असे होते “खाणार्‍यातून अन्न; प्रबळातून माधुर्य ते काय?” तीन दिवसापर्यंत ते उत्तर देऊ शकले नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options