Skip to content
शास्ते १४:१५-१८

शास्ते १४:१५-१८

१५
चौथ्या दिवशी ते शमशोनाच्या पत्नीस म्हणाले, “तुझ्या पतीला फूस लावून या कोड्याचा अर्थ काढून घे नाहीतर किंवा तुझ्यासह आम्ही तुझ्या वडिलांचे घर तुम्ही मरेपर्यंत जाळून टाकू. आमची मालमत्ता चोरण्यासाठी आम्हाला या मेजवानीला बोलाविले होते का?”
१६
तेव्हा शमशोनाची पत्नी त्याच्यापुढे अश्रू गाळीत म्हणाली, “तुम्ही माझा द्वेष करता! तुम्ही माझ्यावर प्रीती करीत नाही. कारण तुम्ही माझ्या लोकांना कोडे घातले आहे, परंतु तुम्ही मला उत्तर दिले नाही.” तो तिला म्हणाला, “मी माझ्या वडिलांना किंवा आईला देखील कोड्याचे उत्तर सांगितले नाही, तर मग मी तुला ते का सांगावे?”
१७
मेजवानीचे संपूर्ण सात दिवस ती रडली. त्यामुळे सातव्या दिवशी शेवटी त्याने तिला सांगितले, कारण ती त्याच्यावर फार दबाव टाकत होती. तिने जाऊन आपल्या लोकांना कोडे समजावून सांगितले.
१८
सातव्या दिवशी सूर्यास्त होण्यापूर्वी नगरातील लोक त्याला म्हणाले, “मधापेक्षा गोड काय आहे? सिंहापेक्षा बलवान काय आहे?” शमशोन त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्या कालवडीने नांगरणी केली नसती, तर तुम्ही माझे कोडे सोडविले नसते.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options