Skip to content
यहोशुआ ३:१-८

यहोशुआ ३:१-८

१
दुसर्‍या दिवशी पहाटेच यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी शिट्टीम सोडले आणि ते यार्देन नदी पार करण्यापूर्वी त्यांनी काही दिवस तिथेच तळ दिला.
२
मग तीन दिवसानंतर अधिकार्‍यांनी छावणीत फिरून लोकांना या सूचना दिल्या:
३
“तुम्ही जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वराच्या कराराचा कोश व तो वाहत असणार्‍या लेवी याजकांना पाहाल, तेव्हा तुमच्या ठिकाणातून निघून त्यांच्या पाठोपाठ जा.
४
तेव्हा कोणत्या मार्गाने जावे हे तुम्हाला समजेल, कारण तुम्ही या मार्गाने पूर्वी कधी गेला नाही. परंतु तुमच्यात व कोशात अंदाजे वीस हजार हाताचे अंतर असावे; तुम्ही त्याजवळ जाऊ नये.”
५
मग यहोशुआने लोकांना सांगितले, “तुम्ही शुद्ध व्हा, कारण उद्या तुम्हामध्ये याहवेह एक महान चमत्कार करणार आहेत.”
६
यहोशुआने याजकांस म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि लोकांच्या पुढे चला.” तेव्हा त्यांनी कोश घेतला व लोकांच्या पुढे निघाले.
७
मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुला मोठा सन्मान बहाल करणार आहे, म्हणजे सर्व इस्राएली लोकांना कळून येईल की, मी जसा मोशेबरोबर होतो, अगदी तसाच तुझ्याबरोबर देखील आहे.
८
कराराचा कोश वाहून नेणार्‍या याजकांना सांग, ‘जेव्हा तुम्ही यार्देन नदीच्या पाण्याच्या काठावर पोहोचाल तेव्हा जा व नदीत उभे राहा.’ ”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options