मुख्य मजकुरावर जा
यहोशुआ २०:१-६

आश्रयनगरे स्थापन करण्याची आज्ञा

यहोशुआ २०:१-६
तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले:
“इस्राएली लोकांना सांग, मोशेद्वारे तुम्हाला सुचविल्यानुसार आश्रयाची शहरे नेमून द्यावीत.
यासाठी की जर एखाद्याने अकस्मात् आणि अजाणतेने एखाद्या व्यक्तीची हत्या केली, तर त्याने तिथे पळून जावे आणि रक्ताचा सूड घेणार्‍यापासून आश्रय घेऊन सुरक्षित राहावे.
जेव्हा ते या शहरांपैकी एका शहराकडे पळून जातील, तेव्हा त्यांनी त्या शहराच्या वेशीवर उभे राहावे आणि आपली हकिकत त्या शहराच्या वडीलजनांना सांगावी. आणि त्या वडिलांनी त्या पळून आलेल्या व्यक्तीला त्यांच्या शहरात घ्यावे आणि त्यांच्यामध्ये राहण्यासाठी त्याला जागा द्यावी.
जर रक्ताचा सूड घेणारा शोध करीत आला तर, वडिलांनी त्या पळून आलेल्या व्यक्तीला त्याच्याकडे स्वाधीन करू नये, कारण त्याने आपल्या शेजार्‍याचा काही दुष्ट उद्देश नसताना वध केला आहे आणि त्याच्या मनात कोणतीही द्वेषभावना नव्हती.
जोपर्यंत तो सभेसमोर खटल्यासाठी उभा राहत नाही आणि त्यावेळेस तिथे सेवा करीत असलेला महायाजकास मृत्यू येईपर्यंत त्याने त्या शहरात राहावे. त्यानंतर तो व्यक्ती जिथून पळून आला, त्या नगरात स्वतःच्या घरी परत जावे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options