यहोशुआ १७:७-११
७
मनश्शेहच्या गोत्राची सीमा आशेरापासून शेखेमाच्या पूर्वेस मिकमथाथपर्यंत जाते. तिथून ही सीमा दक्षिणेला एन-तप्पूआहच्या लोकांच्या वस्तीपर्यंत जाऊन पोहोचते.
८
(मनश्शेहकडे तप्पूआहचा प्रांत होता, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाच्या सीमेवरील तप्पूआह एफ्राईमकडे होते.)
९
ती सीमा पुढे दक्षिणेकडील कानाहा ओढ्याकडे जाते. एफ्राईमच्या मालकीची नगरे मनश्शेहच्या नगरांमध्ये होती, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाची सीमा ओढ्याच्या उत्तरेकडे होती आणि भूमध्य समुद्राकडे संपते.
१०
दक्षिणेकडील प्रदेश एफ्राईमच्या मालकीचा होता व उत्तरेकडे असलेली शहरे मनश्शेहची होती. मनश्शेहची सीमा भूमध्य समुद्रापर्यंत होती आणि त्याच्या उत्तरेकडे आशेर व पूर्वेकडे इस्साखार आहेत.
११
इस्साखार आणि आशेरच्या प्रदेशात बेथ-शान, इब्लाम आणि दोर येथील लोक, एनदोर, तानख, आणि मगिद्दो त्यांच्या जवळच्या वसाहतीसह मनश्शेहचे होते (यादीतील तिसरे नगर नाफोथ होते).
Settings