Skip to content
योएल ३:१७-२१

परमेश्वर सियोनमध्ये सदासर्वदा वास करतो

योएल ३:१७-२१
१७
“तेव्हा तुम्हाला कळून येईल की सीयोनात, माझ्या पवित्र पर्वतावर, राहणारा मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. यरुशलेम पवित्र होईल; परकीय लोक तिच्यावर पुन्हा कधीही आक्रमण करणार नाहीत.
१८
“त्या दिवशी नवीन द्राक्षारस पर्वतांवरून पाझरेल, आणि टेकड्यांवरून दूध वाहील; यहूदीयातील ओहोळांची कोरडी पात्रे पाण्याने भरून वाहतील आणि याहवेहच्या मंदिरातून एक झरा निघेल व तो शिट्टीमच्या खोर्‍यात पाणी पुरवेल.
१९
इजिप्त देश उजाड होईल आणि एदोम देश ओसाड होईल, कारण त्यांनी यहूदीयाच्या लोकांवर अत्याचार केला त्यांच्या देशात त्यांनी निर्दोष रक्त पाडले आहे.
२०
परंतु यहूदाह सदासर्वकाळ आणि यरुशलेम पिढ्यान् पिढ्या वसलेले राहील.
२१
त्यांच्या निर्दोष रक्ताचा सूड न घेता मी जाईन काय? नाही, मुळीच नाही.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options