Skip to content
इय्योब ८:१४-१९

इय्योब ८:१४-१९

१४
ठिसूळ गोष्टींवर त्यांची भिस्त असते, ज्यावर ते अवलंबून राहतात ते मकडीच्‍या जाळासारखे आहे.
१५
ते जाळ्यावर विसंबून राहतील, परंतु ते टिकून राहवयाचे नाही; ते त्याला बिलगतील, परंतु ते मजबूत राहत नाहीत.
१६
सूर्यप्रकाशात भरपूर पाणी दिलेल्या रोपट्यासारखे ते होतात. त्यांच्या फांद्या बागेत सर्वत्र पसरतात.
१७
त्याची मुळे दगडांच्या चोहो बाजूंना वेढतात. आणि त्यांच्यामध्ये आपली जागा शोधतात.
१८
परंतु जेव्हा त्याला त्याच्या जागेवरून उपटून टाकले जाते, तर ती जागा त्याला नाकारून म्हणते, ‘मी तुला कधीही पाहिले नाही.’
१९
त्याचे जीवन खचित कोमेजून जाते, आणि मातीतून दुसरी रोपटे आनंदाने उगवतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options