इय्योब ६:२४-३०
२४
“मला शिकवा आणि मी शांत बसेन; मी कुठे चुकलो ते मला सांगा.
२५
सत्य बोलणे हे किती क्लेशदायक असते! परंतु तुमचे वाद काय सिद्ध करतात?
२६
तुम्ही मला शब्दात धरावयास पाहता का, माझे निराशेचे शब्द वार्यासारखे वाटतात का?
२७
तुम्ही तर अनाथांवर चिठ्ठ्या टाकण्यास व आपल्या मित्रांची विक्री करण्यास चुकत नाही.
२८
“पण आता कृपा करून माझ्याकडे नीट पाहा. मी तुमच्या तोंडावर तुमच्याशी लबाडी करेन, असे तुम्हाला वाटते का?
२९
कळवळा येऊ द्या, अन्याय करू नका; पुन्हा विचार करा, कारण माझी सत्यता पणास लागली आहे.
३०
माझ्या जिभेवर काही दुष्टपणा आहे काय? माझ्या मुखाला अधर्माची पारख नाही काय?
Settings