Skip to content
इय्योब ७:१-६

जीवनाची व्यथा व अल्पायुष्य

इय्योब ७:१-६
“या पृथ्वीवर मानवाला कठीण श्रम करावे लागत नाहीत का? त्यांचे दिवस हे मोलकर्‍यासारखे नाहीत काय?
जसा गुलाम उत्कंठेने संध्याकाळच्या छायेची उत्कंठेने वाट पाहतो, किंवा जसा मजूर वेतनासाठी आशा लाऊन असतो,
त्याचप्रमाणे मला निष्‍फळतेचे महिने दिले गेलेले आहेत, कष्टाच्या रात्री माझ्यासाठी नेमलेल्या आहेत.
मी झोपी जाण्याच्या वेळी विचार करतो, ‘उठण्यासाठी अजून किती वेळ आहे?’ रात्र काही संपतच नाही, पहाटेपर्यंत मी तळमळत असतो.
माझे मांस किड्यांनी व खपल्‍यांनी आच्छादून गेले आहे; माझी त्वचा फाटून चिघळत आहे.
“माझे दिवस विणकर्‍याच्या मागापेक्षा वेगवान आहेत, आणि ते आशेविनाच संपतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options