इय्योब ७:७-१०
७
हे परमेश्वरा माझे जीवन मात्र श्वास आहे याची आठवण करा; माझे नेत्र पुन्हा कधीही सुख पाहणार नाहीत.
८
जे मला आता पाहतात ते मला आणखी पाहणार नाहीत; तुम्ही मला शोधाल पण मी अस्तित्वहीन असेन.
९
ढग जसे विरळ होऊन नाहीसे होतात, त्याचप्रमाणे जो कबरेत जातो तो कधीही परत येत नाही.
१०
तो आपल्या घरी परत कधीही येणार नाही; त्याचे वसतिस्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही.
Settings