इय्योब ७:११-१६
११
“म्हणून मी शांत राहणार नाही; मी आपल्या आत्म्याचा खेद उघड करून सांगेन, माझ्या जिवाच्या कडूपणात मी गार्हाणे करेन.
१२
मी सागर किंवा खोल पाण्यातील विक्राळ जलचर आहे का, की तुम्ही माझ्यावर पहारा करावा?
१३
जेव्हा मला वाटते की माझे अंथरूण मला समाधान देईल, आणि माझा पलंग माझे गार्हाणे हलके करेल,
१४
तेव्हा सुद्धा तुम्ही मला स्वप्नांनी घाबरवितात आणि दृष्टान्तांनी मला भेडसावतात,
१५
असे की या माझ्या शारीरिक स्थितीपेक्षा, गळा दाबून मरणे मला बरे वाटते.
१६
मी आपल्या जिवाचा तिरस्कार करतो; मी सर्वकाळ जगणार नाही. मला एकटे असू द्या; माझ्या जीवनाला काही अर्थ नाही.
Settings