इय्योब ५:६-११
६
कारण कष्ट मातीतून वाढत नाही, आणि संकट सुद्धा जमिनीतून उगवत नाहीत.
७
खरोखर जशा अग्नीच्या ठिणग्या वर उडतात तसा मनुष्यही कष्टासाठी जन्मला आहे.
८
“मी तुझ्या जागी असतो तर मी माझी बाजू परमेश्वरासमोर सादर केली असती; त्यांच्यापुढे मी आपला वाद मांडला असता.
९
आकलन होऊ शकत नाहीत अशी महान चिन्हे, व मोजता येत नाहीत अशी अगणित अद्भुत कृत्ये ते करतात.
१०
ते पृथ्वीला पावसाचा पुरवठा करतात; आणि शेतांवर पाणी पाडतात.
११
नम्र लोकांना ते उंचस्थानी ठेवतात, जे विलाप करतात त्यांना सुरक्षित स्थळी नेतात.
Settings