Skip to content
इय्योब ३९:२२-२८

इय्योब ३९:२२-२८

२२
तो भयास हसतो आणि कशालाही घाबरत नाही; तलवारीपासून तो मागे हटत नाही.
२३
त्याच्या पाठीवर असलेला भाता; व त्याच्याबरोबर ठेवलेला चमकणारा भाला व बरची खणखणत असते.
२४
तो बेभान आवेशात भूमी गिळंकृत करतो; रणशिंगाच्या गर्जनेने तो स्तब्ध उभा राहू शकत नाही.
२५
तुतारीच्या नादाला तो ‘वाह!’ असे ओरडतो, दुरूनच तो लढाईचा वास घेतो, मग ती सेनापतीची ओरड असो किंवा रणगर्जना.
२६
“बहिरी ससाणा उंच उडतो, आणि आपले पंख दक्षिणेकडे पसरतो, ते तो तुझ्या ज्ञानाने करतो काय?
२७
तुझ्या आज्ञेनेच गरुड उंच भरार्‍या मारत आणि आपले घरटे उंचावर बांधतात काय?
२८
तो उंच कडांवर वसतो आणि रात्री तिथेच राहतो; खडकाळ सुळका त्याचा भक्कम किल्ला आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options