Skip to content
इय्योब ३८:२२-३५

इय्योब ३८:२२-३५

२२
“हिमाच्या कोठारांमध्ये तू प्रवेश केलास काय किंवा गारांची भांडारे तू पाहिलीस काय?
२३
जी मी संकट काळासाठी, लढाई आणि युद्धाच्या दिवसांसाठी राखून ठेवतो?
२४
आकाशात चमकणारी वीज कुठून पांगवली जाते, किंवा जिथून पूर्वेचा वारा पृथ्वीवर विखुरला जातो, त्याचा मार्ग कुठे आहे?
२५
मुसळधार पावसासाठी प्रवाह, आणि वादळी पावसाची वाट कोण खणतात,
२६
म्हणजे ज्या भूमीवर कोणीही लोक राहत नाहीत, निर्जन वाळवंटामध्ये पाणी पुरवठा करू शकेल,
२७
यासाठी की ते ओसाड उजाड भूमीला तृप्त करेल व तिथे गवत उगवू शकेल?
२८
पावसाला पिता आहे का? दहिवराच्या थेंबांचा पिता कोण आहे?
२९
बर्फ कोणाच्या उदरातून येते? आकाशातील गारठ्याला कोण जन्म देते
३०
जेव्हा पाणी दगडासारखे घट्ट होते, जेव्हा खोल सागराचा पृष्ठभाग गोठून जातो?
३१
“कृत्तिकापुंजाचे सौंदर्य तू बांधू शकतो काय? मृगशीर्षाचे बंध तुझ्याने सोडवतील काय?
३२
तू त्यांच्या ॠतूनुसार नक्षत्रांचे समूह उगवतीस आणू शकतो काय सप्तॠषीला व त्याच्या उपग्रहांना चालवशील काय?
३३
स्वर्गाचे नियम तुला माहिती आहेत काय? परमेश्वराची सत्ता तू पृथ्वीवर स्थापित करू शकतो काय?
३४
“ढगांपर्यंत तुझा आवाज तुला उंचाविता येईल काय पुराच्या पाण्याने स्वतःला झाकता येईल काय?
३५
आकाशातील विजेला कोसळण्यापासून तू थांबवू शकतो काय? ‘आम्ही इथे आहोत’ असे निवेदन ते तुला देतात काय?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options