Skip to content
इय्योब ३८:१६-२१

इय्योब ३८:१६-२१

१६
“समुद्राच्या उगम स्थानांपर्यंत तू कधी प्रवास केला काय किंवा त्याच्या खोल गर्तेमध्ये कधी चालत गेलास काय?
१७
मृत्यूची द्वारे तुला दाखविली गेली आहेत काय? अति खोल अंधकाराचे दरवाजे तू पाहिलेस काय?
१८
पृथ्वीचा विस्तार केवढा आहे याचे आकलन तुला झाले आहे का, हे सर्व जर तू जाणतोस तर मला सांग.
१९
“प्रकाशाच्या निवासस्थानाकडे नेणारी वाट कोणती आहे? आणि अंधार कुठे वस्ती करतो?
२०
त्यांच्या ठिकाणांपर्यंत त्यांना तू घेऊन जाशील काय? त्यांच्या घराच्या वाटा तुला माहीत आहेत काय?
२१
तुला हे नक्कीच माहीत असणार, कारण तेव्हा तर तू जन्मला होता! तू तर पुष्कळ वर्षे जगला आहेस!
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options