इय्योब २१:२७-३४
२७
“आता तुम्ही काय विचार करतात हे मला चांगले माहिती आहे, माझे वाईट होईल अशा योजना तुम्ही करता.
२८
तुम्ही विचारता, ‘त्या महान व्यक्तीचे घर कुठे आहे, ज्यात दुष्टाचा डेरा होता?’
२९
जे प्रवास करतात त्यांना तुम्ही कधीही प्रश्न विचारला नाही काय? आणि त्यांच्या अनुभवांकडे लक्ष दिले नाही काय—
३०
अरिष्टाच्या दिवशी बहुधा दुष्टाचा बचाव होतो, आणि क्रोधाच्या दिवशी ते सोडविले जातात?
३१
उघडपणे त्यांना कोण दोष लावणार? त्यांनी जे केले आहे, त्याचे प्रतिफळ त्यांना कोण देणार?
३२
त्यांना कबरेकडे वाहून नेले जाते, आणि त्यांच्या धोंड्यावर पहारा ठेवतात.
३३
दरीतील माती त्याला गोड लागते; असंख्य त्यांच्यापुढे गेले आहेत, आणि सर्व लोक त्यांचे अनुसरण करतात.
३४
“तर तुमच्या निरर्थक शब्दांनी तुम्ही माझे सांत्वन कसे कराल? कारण तुमची प्रत्युत्तरे केवळ असत्य आहेत!”
Settings