इय्योब १८:५-१७
५
“दुष्टांचा दिवा विझून जातो; त्याच्या अग्नीच्या ज्वाला पेटावयाच्या थांबतात.
६
त्याच्या तंबूतील प्रकाश अंधकार होऊन होतो; त्याच्या जवळचा दिवा विझून जातो.
७
त्याच्या पावलांचा प्रभाव दुर्बल होतो; त्याच्या स्वतःच्याच योजना त्याला खाली खेचतात.
८
त्याचेच पाऊल त्याला पाशात अडकवितात; आणि त्याच्या जाळ्यात तो सापडतो.
९
फास त्याची टाच पकडते; आणि तो सापळ्यात धरला जातो.
१०
त्याच्यासाठी गळफास जमिनीत लपविलेला आहे; त्याच्या मार्गात सापळा ठेवलेला आहे.
११
आतंक त्याला चहूकडून घेरून आहे आणि त्याच्या प्रत्येक पावलांवर कुत्र्यांचे भय आहे.
१२
विपत्ती त्याच्यासाठी भुकेलेली आहे; तो पडला तर, विनाश त्याच्यासाठी तयारच आहे.
१३
रोगाने त्याची त्वचा खाऊन टाकली आहे; मृत्यूचे पहिले अपत्य त्याचे अवयव गिळून टाकतात.
१४
त्याच्या सुरक्षित डेर्यांतून त्याला फाडून भयाच्या राजापुढे त्याला फरफटीत नेले आहे.
१५
अग्नी त्याच्या डेर्यात वस्ती करते; त्याच्या घरावर गंधक विखुरले आहे.
१६
त्याची मुळे खाली सुकतात आणि त्याच्यावर सर्व फांद्या वाळून जातात.
१७
पृथ्वीवरून त्याच्या अस्तित्वाची आठवण नाहीशी होते; आणि आता भूमीवर त्याचे नाव राहणार नाही.
Settings