इय्योब १९:१-६
१
मग इय्योबाने उत्तर देत म्हटले:
२
“किती काळ तुम्ही मला त्रास देणार आणि आपल्या शब्दांनी मला चिरडणार?
३
एवढ्यात दहा वेळा माझी निंदा करून; निर्लज्या सारखा तुम्ही माझ्यावर हल्ला केला.
४
मी जर खरोखरच चुकलो असेन, तरी त्यासाठी मी स्वतः जबाबदार असणार.
५
जर स्वतःला तुम्ही खरच माझ्यापेक्षा थोर समजता आणि माझ्या या दैनावस्थेचा माझ्याविरुद्ध गैरउपयोग करता,
६
तर ही गोष्ट लक्षात घ्या, की ही स्थिती परमेश्वराने माझ्यावर आणली आहे आणि आपल्या जाळ्यात मला वेढले आहे.
Settings