इय्योब १८:१५-२१
१५
अग्नी त्याच्या डेर्यात वस्ती करते; त्याच्या घरावर गंधक विखुरले आहे.
१६
त्याची मुळे खाली सुकतात आणि त्याच्यावर सर्व फांद्या वाळून जातात.
१७
पृथ्वीवरून त्याच्या अस्तित्वाची आठवण नाहीशी होते; आणि आता भूमीवर त्याचे नाव राहणार नाही.
१८
प्रकाशातून त्याला अंधाराच्या राज्यात घालविले आहे; आणि जगातून तो हद्दपार केला गेला आहे.
१९
त्याच्या लोकात त्याला पुत्र किंवा कोणीही वारस नाहीत, तो जिथे राहत होता, तिथेही कोणी उरले नाहीत.
२०
पश्चिमेचे लोक त्याची अवस्था बघून भयप्रद होतात; हा भयंकर अंत पाहून पूर्वेकडील लोक घाबरून जातात.
२१
पातक्यांचे जीवन खचितच असे असते; परमेश्वराला जे ओळखीत नाहीत, त्यांचे ठिकाण असेच असते.”
Settings