मुख्य मजकुरावर जा
इय्योब १०:८-१२

निर्मिती व नाश यांचा विरोधाभास

इय्योब १०:८-१२
“तुमच्या हातांनी मला घडवून निर्माण केले आहे. आणि तुम्हीच फिरून मला नष्ट करणार आहात काय?
तुम्ही मला मातीच्या कलशाप्रमाणे घडविले याचे स्मरण करा, पुन्हा तुम्हीच मला धुळीत मिळविणार काय?
१०
दुधाप्रमाणे तुम्ही मला ओतले नाही का तरी दह्यासारखे तुम्हीच विरजवले आहे,
११
तुम्ही मला त्वचा व मांस दिले, आणि हाडे व स्नायू यांनी मला जोडले नाही का?
१२
तुम्ही मला जीवन देऊन दया दाखविली, आणि तुमच्या निगेत माझा आत्मा सुरक्षित राहिला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options